पश्चिम महाराष्ट्र

जागतिक महिला दिनानिमित्त अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते नारीशक्ती सन्मान

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : सिनेअभिनेत्री अलका कुबल यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या भूमी फौंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार, दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ४ वा. वाघोली, पुणे येथील सोयरिक मंगल कार्यालयात जागतिक महिला दिन कार्यक्रम सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व सन्मान नारीशक्ती व संस्थेच्या निवासी प्रकल्पास मददगार संवाद व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून प्रमुख अतिथी सिनेअभिनेत्री अलका कुबल आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्था अध्यक्ष डॉ कैलास पवार यांनी श्रीरामपूर शाखेत दिली.

गरजू शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सुटावा म्हणून वाघोली येथे निवासी प्रकल्प सुरु केलेला आहे. मुलींना मोफत शिक्षण व जेवण, राहण्याची सुविधा देण्यात येत आहे. या मुलींना भेटण्यासाठी संस्थेस भेट देण्यासाठी सिने अभिनेत्री अलका कुबल येत आहेत. समाजास, गरजूंना प्रकल्पास सहकार्य करण्यासाठी आवाहन करण्यासाठी येणार आहेत. तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक डॉ. कैलास पवार, सौ. अनिता पवार आदि सदस्यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button