राहुरीत युवा ग्रामीण पत्रकार संघाची बैठक उत्साहात संपन्न
तालुका उपाध्यक्षपदी खेमनर, सचिवपदी वाघ, तर जिल्हा कार्यकारिणीत पवार व जाधव यांची वर्णी

राहुरी : युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राहुरी तालुका कार्यकारिणीची बैठक आज मोठ्या उत्साहात पार पडली. राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, प्रमुख मार्गदर्शक प्रभंजन कनिंगध्वज, जिल्हा विधी सल्लागार दीपक मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा सचिव राजेंद्र म्हसे आणि तालुकाध्यक्ष अशोक मंडलिक यांची उपस्थिती होती.
या बैठकीत संघटनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी काही महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले. राहुरी तालुका उपाध्यक्षपदी रमेश खेमनर, सचिवपदी सोमनाथ वाघ, उत्तर जिल्हा सचिवपदी रमेश जाधव, तर सहसचिवपदी राजेंद्र पवार यांची निवड करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले व जिल्हा सचिव राजेंद्र म्हसे यांच्या हस्ते निवडपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले यांनी पत्रकारांच्या अडचणींवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “पत्रकारांना वार्तांकन करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. समाजातील विविध अन्याय-अत्याचार उघड करताना त्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत संघटना त्यांच्या हक्कांसाठी लढा देईल आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.”
बैठकीत पत्रकारांच्या न्याय्य मागण्या आणि संरक्षणासाठी विविध उपाययोजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, जिल्हा ज्येष्ठ पत्रकार व प्रेस फोटोग्राफर देवराज मन्तोडे, सागर पवार, दीपक गायकवाड यांना तालुका कार्यकारिणीत स्थान देण्यात आले. यावेळी दीपक मकासरे, प्रमोद डफळ, दिनेश गायकवाड यांसह अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.