अहिल्यानगर
सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आमदार ओगले यांना निवेदन

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार हेमंत ओगले यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गोसावी, माजी अध्यक्ष रावसाहेब पवार, सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, अशोक बागुल, पाटीलबा खपके, लहू कोल्हे, सुरेश तडके, सुरेश कांबळे, रमेश वारुळे आणि राजू थोरात आदी उपस्थित होते.