ब्राह्मणगाव वेताळ विकास सोसायटीचे कार्य गौरवास्पद – माजी आमदार भानुदास मुरकुटे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : ब्राह्मणगाव वेताळ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे कार्य उत्तम प्रकारे असून प्रगतीपथावर वाटचाल सुरू आहे. सोसायटीची नवीन वास्तू कमी खर्चात उभारली असून त्याचा शुभारंभ आज होत आहे हे गौरवास्पद आहे असे प्रतिपादन अशोक कारखाना चेअरमन व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शुभारंभ प्रसंगी केले.
पुढे बोलताना माजी आमदार मुरकुटे म्हणाले की, आपल्या परिसरातील साखर कारखाने बंद पडले आहेत. अशोक कारखाना फक्त प्रगतीपथावर आहे याची जाणीव सभासदांनी, शेतकऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे. परिसरातील ऊस जर बाहेर जात असेल तर तशी परिस्थिती याही कारखान्याची होईल, त्याला आपण सर्व जबाबदार राहतील. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
यावेळी दुसऱ्या हॉलचा शुभारंभ श्रीरामपूर विधानसभा नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले यांनी केला व त्याबद्दल शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक व मान्यवराचे स्वागत सोसायटी चेअरमन दत्तात्रय वेताळ यांनी केले. अध्यक्षस्थानी आमदार हेमंत ओगले हे होते. यावेळी आमदार हेमंत ओगले यांनी शुभेच्छा देताना सांगितले सोसायटीस आवश्यक ते सहकार्य केले जाईल. सध्या श्रीरामपूर येथे अतिक्रमण काढल्याने बाराशे प्रपंच रस्त्यावर आले आहेत. त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे, त्यासाठी प्रयत्न केले जातील. माजी नगराध्यक्ष करण ससाणे सचिन गुजर यांनीही मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्हाईस चेअरमन हिम्मतराव धुमाळ, संचालक नीरजभैया मुरकुटे, संचालक विरेश गलांडे, सोपानराव नाईक, सोसायटी चेअरमन दत्तात्रय वेताळ, व्हाईस चेअरमन बापूसाहेब निघुट, व सर्व संचालक सचिव जनार्दन नाईक, हरिदास वेताळ, संदीप वेताळ, गणेश चौधरी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.