साहित्य व संस्कृती

डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा संत चिंतनाचा ‘साहित्यशोध’ निर्मळतेचा बोधग्रंथ- महंत अरुणनाथगिरी महाराज

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : संतकार्य, विचार आणि संतसाहित्य ही एक अमृत संजीवनी असून श्रीमद भागवत कथा जगात सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, अशा श्रेष्ठ ज्ञानयज्ञ कथाप्रसंगी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी लिहिलेला संत चिंतनाचा‌ ‘साहित्यशोध’ ह्या ग्रंथांचे विवरण, वितरण झाले, हा मोठा आनंद आहे, हा संतग्रंथ म्हणजे निर्मळतेचा बोधग्रंथ होय, असे विचार श्रीअडबंगनाथ संस्थानचे मठाधिपती महंत अरुणनाथगिरी महाराज यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर जवळील इंदिरानगर येथील निर्मळ परिवारातर्फे आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ‘साहित्यशोध’ ग्रंथाचे वितरण आणि संवादचर्चा प्रसंगी महंत अरुणनाथगिरी महाराज बोलत होते. प्रारंभी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ‘महंत अरुणनाथगिरी’ ही स्वागतचरित्र कविता सादर करून साहित्यशोध ग्रंथाचे महत्त्व सांगितले. निर्मळ परिवारातर्फे संतपूजन करण्यात आले. सर्व भक्त, साहित्यिकांना शाल, टोपी देऊन निर्मळ परिवाराने सन्मानीत केले.

महंत अरुणनाथ गिरी महाराजांनी उत्कृष्ट संत साहित्यशोध ग्रंथ लिहिल्याबद्दल सत्कार केला. याप्रसंगी ह.भ.प. पुरुषोत्तम कोळपकर महाराज, ह.भ.प. नीळकंठ तरकासे महाराज, ह.भ.प. भागवतराव मुठे महाराज यांनी भागवत ग्रंथांतील विविध भागावर भाष्य करीत महंत अरुणनाथागिरी महाराजांचे मोठेपण सांगितले.

याप्रसंगी महंत अरुणनाथगिरी महाराजांनी ‘साहित्यशोध’ ग्रंथ लिहून बंधू डॉ. उपाध्ये यांनी वाचकांना निर्मळ जीवनाचा संदेश दिला असल्याचे कौतुक केले. निर्मळ परिवाराने गेल्या तीन वर्षापासून श्रीमद भागवत ग्रंथ ज्ञानयज्ञ सुरु ठेवल्याविषयी आनंद व्यक्त करून प्रवचनकार ह.भ.प. पुरुषोत्तम कोळपकर महाराजांच्या मुखातून हा ग्रंथ ऐकणे भाग्य असल्याचे सांगितले. श्रीमदभागवत ग्रंथाच्या श्रवण, वाचनाने सर्व पापे नष्ट होतात. ०४ वेद, ०६ शास्रे, १८ पुराणे त्यामध्ये श्रीमद भागवत गीता सर्वश्रेष्ठ ग्रंथ असून ईश्वराशी एकरूप होण्यासाठी हा सर्वोत्तम ग्रंथ असल्याचे सांगितले.

यावेळी श्यामराव पुरनाळे, सुलोचनाताई पटारे- पुरनाळे, ॲड.अरुणराव लबडे, ॲड. बापूसाहेब इंगळे, प्रा. एकनाथ औटी, भीमराज चाफे, भाऊसाहेब पालवे, दत्तात्रय जायभाये, मोहनराव कोरडे, लखनगिरी महाराज, राम थोरात महाराज, भीमनाथ कटारे, दीपक शेटे, सुमनताई मुठे, कलावती निर्मळ, चंद्रभान निर्मळ, मोहिनी निर्मळ, वेदिका निर्मळ, अर्चना निर्मळ, दुर्गेश्वरी निर्मळ, प्रथमेश निर्मळ, कैलास निर्मळ, विकास निर्मळ आर्यवीर निर्मळ, ओमराज निर्मळ, अर्जुन नवथर, विश्वजित निर्मळ, मंगल उगले, राधाबाई पालवे, आदित्य गुळवे, आहिरे आजीसह भक्तगण उपस्थित होते.

ह.भ.प. भागवत मुठे महाराज यांनी अजामेळ कथा सादर केली तर ह.भ.प.पुरुषोत्तम कोळपकर महाराज यांनी श्रीराम कथेचे सादरीकरण केले. ह.भ.प. नीळकंठ तरकासे महाराजांनी भक्ती गीते सादर केली. भजने, आरती झाली. शेवटी दुर्गेश्वरी निर्मळ यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button