क्रांतीसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी सुभाष दरेकर
श्रीगोंदा – तालुक्यातील हिरडगाव येथील सुभाष पंढरीनाथ दरेकर यांची अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या अहिल्यानगर जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरेकर यांना नियुक्तीचे पत्र पक्षाचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी दिले.
सुभाष दरेकर यांनी यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तसेच जिल्हा प्रमुख पदावर कार्य करताना उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात क्रांतीसेनेचे मोठे जाळे निर्माण केले. युवकांचे संघटन करत असताना सामाजिक बांधिलकी जपत शेतकर्यांचा वीज प्रश्न सोडविण्यासाठी महावितरण, कुकडी पाणी प्रश्नी, पशुधनाला लाळखुरकत सारखे लसीकरण होत नसताना आंदोलनाचा इशारा देत लसीकरण करण्याची मागणी, भारत गॅस रिसोर्सेसने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, विद्यार्थ्यांना मोफत बस पास, महोगनी वृक्ष लागवड अनुदानासाठी लढा देत श्रीगोंदा तालुक्यातील कामगारांचे प्रश्नांबरोबर सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले.
या निवडीबद्दल क्रांतीसेनेच्या संस्थापिका माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील, पक्षप्रमुख संतोष तांबे, सरचिटणीस नितीन देशमुख, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, संदीप डेबरे, वैभव जाधव, भरत भुजबळ, विक्रम ढवळे, विकास म्हस्के, शब्बीर शेख, गोकुळ नेटके, साजन शेख, दादा दंडे, भाऊसाहेब सुद्रिक, इंद्रजित शिंदे, पप्पू देशमुख, सागर दरेकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.