कु. अवनी सलालकर ॲबेकस मध्ये प्रथम

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – सोलापूर येथे राष्ट्रीय पातळीवर निशा ॲबेकस या संस्थेने घेतलेल्या स्पर्धा परिक्षेत श्रीरामपूर येथील एस.के.सौमैय्या प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी कु. अवनी सलालकर हिने OPTIOAL (ZIRO) मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर ORIGANL (KID) मध्ये तृतीय क्रमांक पटकावला.
कु.अवनी हिस सौ.संचिता नरोटे यांनी मार्गदर्शन केले. तिच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेच्या मॅनेजिंग कौंन्शिल सदस्या श्रीमती मीनाताई जगधने, माजी प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, पुरुषोत्तम मुळे, मुख्याध्यापिका श्रीमती पैठणे मॅडम, वर्गशिक्षिका श्रीमती पवार मॅडम, माधवराव तिटमे, माजी मुख्याध्यापक नवनाथ अकोलकर, चंद्रकांत कराळे, शिवराज तिटमे, श्रीमती अमृता अकोलकर, वर्षा वाकचौरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.