गुन्हे वार्ता

फ्लेक्स फाडले तरी जनमत बदलणार नाही-आशिष कानवडे

सोनई – फ्लेक्स फाडले तरी आता नेवासा विधानसभा मतदारसंघातील जनतेने परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनमत बदलणार नाही, विरोधकांनी पातळी सोडू नये असा इशारा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे जिल्हाप्रमुख आशिष कानवडे यांनी दिला आहे.

नेवासा विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन महाशक्तीचे तथा प्रहार पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांचा प्रचार गाडीचा फ्लेक्स अज्ञात लोकांनी फाडला असून त्यावर गुन्हा नोंदवला असून पोलीस सदर प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष पदाधिकार्यांनी सोनई पोलीस स्टेशन येथे पी एस आय श्री.माळी यांची भेट घेऊन सदर प्रकरणातील विकृत व दहशत पसरू पाहणाऱ्या आरोपींना अटक करावी अशी मागणी केली.

तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करताना अशा प्रकारे पातळी सोडून फ्लेक्स बोर्ड फाडण्याचा प्रकार सुरू झाला आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये सर्व उमेदवारांना प्रचाराचा अधिकार आहे. परंतु, संबंधित विरोधकांची पायाखालची जमीन घसरल्याने असे प्रकार सुरू झाले आहेत. संबंधित घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा प्रमुख कानवडे यांनी केली आहे.

यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे जिल्हाप्रमुख आशिष कानवडे, संगमनेर तालुका प्रमुख निलेश पवार, शहर प्रमुख आकाश शिंदे, नेवासा संपर्क प्रमुख परशराम मोकाने, जय दुशिंग, साहिल गडाख आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button