गांडूळखत उत्पादन व विक्री व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : कृषीभूषण ॲग्रो टुरिझम आणि गोदागिरी फार्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी, युवक-युवती व उद्योजक यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गांडूळखत उत्पादन व विक्री व्यवस्थापन या विषयावर 10 नोव्हेंबर रोजी ही कार्यशाळा राहता तालुक्यातील लोणी येथे होणार आहे. या कार्यशाळेत सहभागासाठी मर्यादित प्रवेश उपलब्ध असून, सकाळी 10:00 वाजता कार्यशाळेला प्रारंभ होईल आणि सायंकाळी 4:00 वाजता समाप्ती होईल.
कृषी क्षेत्रात शाश्वत विकास साधण्यासाठी गांडूळखत प्रकल्प हा महत्वाचा घटक मानला जात आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झिरो बजेटमध्ये गांडूळखत व्यवसाय उभारण्याच्या संधी आणि विक्री व्यवस्थापनाबाबत सखोल मार्गदर्शन कृषिभूषण बन्सी तांबे हे देणार आहेत. विशेषत: लाईव्ह प्रात्यक्षिके आणि मार्केट डेव्हलपमेंट प्लॅन यासारखे उपक्रम या कार्यशाळेत होणार असल्याची माहिती ऋषिकेश औताडे यांनी दिली.
कार्यशाळेत सहभाग घेतल्यास प्रमाणपत्र, नाश्ता व रुचकर जेवणाचा आस्वाद याचाही समावेश आहे. कार्यशाळेचे आयोजन कृषीभूषण ॲग्रो टुरिझम, लोणी येथे करण्यात आले असून अधिक माहितीसाठी 9960553407 यावर क्रमांकावर संपर्क साधावा.