धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांचा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना जाहीर पाठिंबा
राहुरी | अक्षय करपे : धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांनी शिवसेना शिंदे गट या पक्षात प्रवेशाचा निर्णय घेऊन महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.
तालुक्यातील तरुणांच्या गळ्यातील ताईत, सामाजिक कार्यकर्ते तथा धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असून निवडणुकीनंतर जाहीररित्या प्रवेश पार पडणार असून तसेच त्यांनी लगेच महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना राहुरी पाथर्डी नगर विधानसभा निवडणुकीत जाहीररित्या पाठिंबा घोषित केलेला आहे.
दरम्यान राहुरी तालुक्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे यांच्या मागे युवक, तरुण व शेतकऱ्यांची मोठी ताकद असल्याने राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये याचे परिणाम महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या पथ्यावर पडणारा असून त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.