अहमदनगर

जेष्ठ पत्रकार उंडे यांना राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार

२१ सप्टेंबर रोजी मलकापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा

राहुरी : तालुक्यातील जेष्ठ पत्रकार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे जिल्हा सदस्य, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक व दै. सामनाचे प्रतिनिधी राजेंद्र गंगाधर उंडे सर यांना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. माणूसकी फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक राजपुरे यांनी या पुरस्काराची घोषणा केली असून या पुरस्काराचे वितरण शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मलकापूर येथे होणार आहे.

पत्रकार राजेंद्र उंडे यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यात प्रमुख्याने, शिवशंभो ट्रस्ट च्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार 2006, अंकुर साहित्य संघाच्या वतीने शोध पत्रकारिता पुरस्कार 2007, ओबीसी एनटी च्या वतीने महाराष्ट्र भूषण पत्रकारिता पुरस्कार 2010, संत सावता युवा संघाच्या वतीने सावता भूषण पत्रकारिता पुरस्कार वर्ष 2011, क्रीडा फाउंडेशनचे वतीने श्री संत भूमिकला, श्री संत भगवान बाबा पत्रकारिता पुरस्कार 2014, हरिहरेश्वर ग्राम विकास फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण समाज भूषण पत्रकारिता पुरस्कार वर्ष 2015, छत्रपति प्रतिष्ठान, उंबरे च्या वतीने छत्रपति पुरस्कार 2016, पत्रकार उत्कर्ष समिति, पनवेल च्या वतीने राज्यस्तरीय शोध पत्रकारिता पुरस्कार 2018, कॉ.जनार्दन माधव पानपाटिल सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य स्तरीय पत्रकारिता पुरस्कार 2018 असे अनेक पुरस्काराचा सामावेश आहे. पत्रकार उंडे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button