साहित्य व संस्कृती

अमरावती विद्यापिठाच्या महानुभाव अध्यासन केंद्रात डॉ.उपाध्ये यांच्या पुस्तकांना संदर्भग्रन्थ मान्यता !

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांची पुस्तके अभ्यासस्तरावर आणि संदर्भग्रन्थ म्हणून अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठ अंतर्गत असलेल्या महानुभाव अध्यासन केंद्रात संदर्भग्रन्थ म्हणून स्वीकारपत्र महानुभाव अध्यासन केंद्र प्रमुख डॉ. राजधर सोनपेठकर यांनी डॉ.बाबुराव उपाध्ये यांना प्रदान केले.


डॉ. राजधर सोनपेठकर यांनी अनेक वेळा डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ग्रन्थनिर्मिती आणि वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे कार्य याबद्दल कौतुक केले. ते श्रीरामपूर येथे महानुभाव अभ्यासप्रवासाला आले असता डॉ.उपाध्ये यांची ग्रन्थसंपदा मौलिक स्वरूपाची असून महानुभाव आणि वारकरी विषयक त्यांनी गुणवत्तापूर्ण संशोधन ग्रन्थ लिहिले आहेत, ते अभ्यासक विद्यार्थीवर्गास उपयुक्त ठरणारे आहेत. डॉ. उपाध्ये यांच्या कार्यालयात डॉ. सोनपेठकर यांनी संदर्भग्रन्थ स्वीकारले असल्याचे पत्र दिले, त्याप्रसंगी डॉ. राजधर सोनपेठकर बोलत होते.

प्रारंभी डॉ. उपाध्ये यांनी डॉ. राजधर सोनपेठकर आणि भैय्या पठाण यांचा सन्मान केला आणि आपली पुस्तके भेट दिली. डॉ.राजधर सोनपेठकर हे श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे रा.ब.नारायणराव बोरावके कॉलेजचे मराठी विभागाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या आणि संशोधन ग्रन्थ लिहिले आहेत. डॉ.र.बा.मंचरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. झाले. बेलापूर रोड येथील श्रीचक्रधर आश्रमात त्यांनी आपला सेवाकाळ व्यतीत केला. अमरावतीच्या विद्यापिठात त्यांनी महानुभाव अध्यासनाला अभ्यासदिशा दिली असल्याचे डॉ. उपाध्ये यांनी सांगून आपले ग्रन्थ”अभ्यासस्तरावर आणि संदर्भग्रन्थ स्वीकल्याबद्दल आभार मानले. तसेच सातारा येथील प्राचार्य सौ. मंगल श्रीधर पाटील यांचे “आयुष्याच्या वळणावर ” हे ललितगद्य तर डॉ. उपाध्ये लिखित “संत साहित्याची ज्योत”, माय मराठी शिदोरी”, “फिरत्या चाकावरती ” तसेच औरंगाबाद येथील लेखक संतोष रंगनाथ लेंभे यांनी लिहिलेला “डॉ. बाबुराव उपाध्ये व्यक्ती आणि वाड्मय “हे ग्रन्थ  अभ्यासस्तरावर स्वीकारले असल्याचे डॉ. सोनपेठकर यांनी सांगून डॉ. उपाध्ये,  प्राचार्य सौ. मंगल पाटील, संतोष लेंभे यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button