ठळक बातम्या

संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा- सुरेशराव लांबे पाटील

राहुरी – शेतकरी, शेतमजुर, विधवा निराधार महिला, सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नोकरी, दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री आ.बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली उद्या संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर दु. 1 वा. भव्य महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी राहुरी तालुका व राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील बहुजन समाजातील शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील केले आहे.

लांबे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, क्रांती दिनाचे औचित्य साधून माजी राज्यमंत्री आ. बच्चुभाऊ कडु यांच्या मोर्चाला पाठींबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन दोन ते तीन लाख बहुजन समाजातील शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बंधू, विधवा निराधार परितक्ता महिला मोर्चामध्ये सामील होणार असुन त्या मोर्चाला पाठींबा देण्यासाठी राहुरी तालुक्यातुन अंदाजे 101 गाड्या स्वखर्चाने घेऊन विविध मागण्या मान्य करण्यासाठी निघणार आहे. त्यामंधे दिव्यांगांच्या मानधनात वाढ करून ते 6 हजार रुपये करावे, विनाअट घरकुल देण्यात यावे, भूमिहीन दिव्यांगांना २०० स्क्वेअर फुट सरकारी जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून द्यावी, यासह शेतकरी, शेतमजूर यांच्या पेरणी ते कापणी पर्यंत सर्व कामे MRGS रोजगार हमी योजनेमार्फत करने, नव्याने युवा धोरण व बेरोजगार युवकांसाठी किमान 5000 कोटींची तरतूद करणे, पेपर फुटी प्रतिबंध कायदा बनविणे, शेतमजूर व प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र्य आर्थिक विकास महामंडळ तयार करणे, कांद्याला हमीभाव देण्यात यावा व कांदा निर्यात बंदी व दुधाच्या भावा संदर्भात ठोस अंमलात आणावे, घरकुलांसाठी 5 लाख रुपये व शहर व ग्रामीण भागात समान निधी असावा, शिक्षण आणि आरोग्य सेवेमध्ये विषमता हटवून समानता आणावी.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शेतीसाठी एकरी एक लाख बिगरव्याजी कर्ज कायमस्वरूपी मिळावे असे विविध प्रलंबित मागण्यासाठी राहुरी तालुक्यासह राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आव्हान प्रहारचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील, उपाध्यक्ष युनुस देशमुख, संघटक प्रशांत पवार, शहराध्यक्ष विक्रमकुमार गाढे, युवा अध्यक्ष रुषीकेश ईरुळे यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button