धार्मिक

हरेगाव मतमाउली यात्रापूर्व दुसरा शनिवार नोव्हेना भक्तिभावात संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे :  हरेगाव संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे मतमाउली यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असून यात्रापूर्व नोव्हेनास ६ जुलैपासून प्रारंभ झाला असून शनिवारी दुसरा यात्रापूर्व नोव्हेना (भक्ती) संपन्न झाली असून नोव्हेना प्रसंगी पवित्र मरिया ख्रिस्ती ऐक्य या विषयावर रे.फा विलास सोनावणे यांनी सविस्तर पवित्र मरीयेचा महिमा वर्णन केला.

त्याचप्रमाणे पवित्र मिस्साप्रसंगी फा.मायकल वाघमारे यांनी प्रतिपादन केले की, आज देवमाता पवित्र मरीयेच्या सन्मानार्थ आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहोत. देवमाता पवित्र मरीयेने प्रभू येशूला जन्म देऊन कुमारिका राहीली आहे. त्या मातेने जीवन जगत असताना अनेक चमत्कार केले आहेत व अजून चमत्कार करीत आहे. प्रभू येशूला जन्म देऊन या जगात जगदात्याची माता बनली आहे. आज आपण तिच्या सन्मानार्थ जमले असता पवित्र मरीयेने आपल्या कुटुंबावर आणि शेजारी सर्वाना आशीर्वाद देण्यासाठी या प्रार्थनेमध्ये विशेष आशीर्वाद मागू या. पवित्र मरीयेचे आपल्याला सतत सहकार्य नियमित लाभो, तिच्या जीवनात ती जी निष्कलंक, निर्दोष, व निष्पाप राहिली देवबापाने तिला निष्कलंक ठेवले, तिच्या व्दारे तारण या जगात आले. प्रभू येशूने त्याव्दारे अखिल मानवजातीचे तारण केले आहे. त्यासाठी आपण देवमातेव्दारे प्रार्थना करू या आपले जीवन हे प्रभू येशूच्या कृपेने सफल होवो…

या नोव्हेनाप्रसंगी निष्कलंक माता चर्च प्रवरानगर बाळ येशू चर्च बाभळेश्वर येथील फा.विलास सोनावणे, फा.मायकल वाघमारे, फा.संजय पंडित, तसेच हरेगाव चर्च प्रमुख धर्मगुरू रे.फा.डॉमनिक रोझारिओ, फा.फ्रान्सिस ओहोळ, संतान रॉड्रीग्ज आदी सहभागी झाले होते. यावेळी धर्मभगिनी भाविक यांची उपस्थिती होती. येत्या २० जुलै रोजी “पवित्र मरिया आणि कुटुंब या विषयावर ज्ञानमाउली चर्च नेवासा, नित्य सहाय्य माता चर्च अशोकनगर येथील धर्मगुरू प्रवचन करणार आहेत. त्या नोव्हेनात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन हरेगाव प्रमुख धर्मगुरू डॉमनिक यांनी केले आहे. 

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button