शिक्षणवारी ज्ञान पंढरी

शिष्यवृत्ती परीक्षेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

16 विद्यार्थी शिष्यवृती करीता पात्र

राहुरी | जावेद शेख : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत कृषी विद्यापीठ राहुरी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे 16 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.

इयत्ता 5 वी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 5 विद्यार्थी व इयत्ता 8 वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 11 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावून विद्यालयाचे एकूण 16 विद्यार्थी शिष्यवृत्ती करीता पात्र ठरले. विशेष बाब म्हणजे इयत्ता पाचवीचा कृष्णा अजेंद्र दुधे जिल्ह्यात दुसरा तर इयता आठवीची कु.कार्तिकी अविनाश सोनवणे या विद्यार्थिनीने राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक व राज्य गुणवत्ता यादीमध्ये ग्रामीण सर्वसाधारण विभागात 19 वा क्रमांक पटकवला.

इयत्ता 5 वी स्कॉलरशिप करीता दुधे कृष्णा अजेंद्र, सधन गणेश झावरे, मोहम्मद वासिम सय्यद, कु.अक्षरा दिलीप कुलकर्णी, ईशान आबा कडूस तर इयत्ता 8 वी स्कॉलरशिप करीता कार्तिकी अविनाश सोनवणे राष्ट्रीय ग्रामीण, ज्ञानदा विशाल भोंडवे, सुयश बाबासाहेब हराळे, श्रेया विवेक ताकटे, प्रथम विनायक जाधव, श्रावण योगेश साळुंखे, सायली पंडित हजारे, सोहम भारत शेडगे, साई किरण सरोदे, प्रणाली संतोष पानसंबळ, महिमा संदीप पवार या पात्र विद्यार्थ्यांना हलीम शेख, रविंद्र हरिश्चंद्रे, सचिन सिन्नरकर, सविता गव्हाणे, कमलेश पवार, हितेश बोंबले, तुकाराम जाधव या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

या उज्वल यशाबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तथा संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांतकुमार पाटील, सचिव डॉ. महानंद माने, खजिनदार महेश घाडगे, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण तुपविहिरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे व पर्यवेक्षक मनोज बावा, प्रा.जितेंद्र मेटकर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button