उपअधीक्षक सुनिल कडू पाटील प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त
राहुरी : उदर निर्वाह चालविण्यासाठी सर्वचजण नोकरी करतात. नोकरी करताना स्वतःचे व्यंग बाजुला ठेवून ऐकण्यास येत नसताना ही समाजाची सेवा करण्याचा संकल्प मनाशी बांधुन कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न धरता शेतकरी व नागरिकांची कामे तातडीने पुर्ण करीत असल्याने सर्वसामान्यांचा अधिकारी म्हणून ओळख निर्माण झालेले राहुरी भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक सुनिल कडू पाटील हे प्रदिर्घ सेवेनंतर शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती निमित्त क्रांती सेना व विविध नागरिकांकडून सन्मान करण्यात आला.
राहुरी भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक सुनिल कडू यांनी राहुरी येथिल पदभार घेण्यापूर्वी श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, कोपरगाव, पारनेर या ठिकाणी शासकीय सेवेत असताना अतिशय प्रामाणीकपणे काम करून गोरगरीब नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात त्यांची धडपड होती. कानाने ऐकू येत नसताना नागरिकांचे कामे सोडविण्यासाठी एका कागदावर कामाची माहिती घेवून तो प्रश्न लेगेच सोडविण्याचा प्रयत्न असायचा. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त शेतकऱ्यांबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर व नातेवाईकांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रभाकर म्हसे, भाऊराव शेळके, मच्छिंद्र लोंढे, पुष्पाताई लोंढे, शरद गाडे, क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, भाजपाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भिंगारदे, प्रभारी उपअधीक्षक रविंद्र खरोटे, चंद्रकांत गाडे, पत्रकार आप्पासाहेब घोलप, कानडगावचे सरपंच मधुकर गागरे, सोमनाथ वने, कृष्णा हापसे आदी उपस्थित होते.