अहमदनगर
ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिरसगाव येथे वृक्षारोपण
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथे राज्याचे महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल मंदिर परिसरात ५०० झाडे लावण्याचा निर्धार संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष गणेशराव मुदगुले यांच्या पुढाकारातून केला होता. त्याप्रमाणे शनिवारी शिरसगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी गणेशराव मुदगुले, उपसरपंच संजय यादव, संदीप वाघमारे, केदार यादव, अशोकराव पवार, बाळासाहेब गवारे, अण्णासाहेब ताके, सनी बिलवरे, शुभम ताके, गणेश वाघ, अनिल बढे, अमोल जाधव, अशोक गवारे, किरण दिवटे, निलेश यादव आदींसह ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.