प्रभू येशू ख्रिस्ताचे दु:ख सहन, मरण, पुनरुत्थान यावर मनन चिंतन आवश्यक-फा.पॉली डिसिल्व्हा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले’ या उक्तीनुसार आजच्या पवित्र आठवड्याच्या सुरुवातीला झावळ्याच्या रविवारी फा.पॉली डिसिल्व्हा यांनी येशू ख्रिस्ताच्या जीवनावर प्रबोधन केले. या पवित्र आठवड्यात प्रभू येशू ख्रिस्ताचे दु:ख सहन व मरण पुनरुत्थान यावर मनन चिंतन करण्यास सर्व ख्रिस्ती बांधवाना आवाहन केले.
आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थांच्या सोहळ्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे आज रविवारी झावळ्याचा रविवार साजरा करीत आहोत. आपण सर्व झावळ्या हातात घेऊन गावातून काढलेल्या मिरवणुकीत सहभागी झालो होतो. दि. २२ मार्च, शुक्रवारपासून तपाला सुरुवात झाली. आज इतकी भाविकांची प्रचंड गर्दी आहे. आजचा विषय आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा दु:ख सहन, मरण, चिंतन दिवस आहे. त्यावर सर्व भाविकांनी मनन चिंतन करावे व आपण ख्रिस्तमय होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कोळपेवाडी येथील रे.फा.पॉली डिसिल्व्हा यांनी रविवारी पवित्र विधिवेळी केले.
प्रारंभी सकाळी ६.४५ वा. हरेगाव डी कॉलनी येथे सणाचे महत्व सांगून राजू पठारे यांच्या निवास स्थानापासून गावातून चर्च पर्यंत सर्वांनी हातात झावळ्या घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी प्रमुख धर्मगुरू रे.फा डॉमनिक, पॉली डिसिल्व्हा, सचिन, डिकन प्रमोद मकासरे, सर्व सिस्टर्स, धर्मग्रामातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नंतर चर्चमध्ये पवित्र मिस्सा झाला. त्यानंतर मतमाउली भक्तीस्थानासमोर भव्य प्रार्थना झाली.
दि. २८ मार्च रोजी आज्ञा गुरुवार, सायं. ६ वा. दि. २९ मार्च उत्तम शुक्रवार [गुड फ्रायडे] सकाळी पवित्र क्रुसाच्या वाटेची भक्ती, सात शब्दावर चिंतन, येशूच्या दु:ख सणावर चिंतन, दि.३० मार्च – पवित्र शनिवार दु:खी मातेच्या सात दु:खावर चिंतन रात्री १० वा. इस्टर रात्रीचा पास्काचा मिस्सा, व ३१ मार्च, रविवारी इस्टर सण सकाळी ८ वा पवित्र संगीत मिस्सा, रात्री मिस्सा, त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक, सचिन रिचर्ड, तसेच सर्व धर्मभगिनी, चर्च संघटना सदस्य, हरेगाव – उंदीरगाव ग्रामस्थांनी केले आहे.