कृषी

औषधी सुगंधी वनस्पती या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित औषधी सुगंधी वनस्पती व पानवेल संशोधन प्रकल्प, वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभाग व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी उपयोजना (टीएसपी) अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग मु.पो. रावलापाणी, ता.तळोदा, जि. नंदुरबार येथे संपन्न झाले.

या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ.संजय गावडे यांनी औषधी व सुगंधी वनस्पतीचे महत्व व लागवड तंत्रज्ञान या विषयी सखोल मार्गदर्शन केले व औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. यावेळी औषधी सुगंधी वनस्पतींची उपलब्ध बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग, देशांतर्गत व परदेशातील मागणी व उत्पादन याबाबत माहिती शेतकर्यांना देण्यात आली.

या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास विशेष उपस्थितांमध्ये नंदुरबार कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. राजेंद्र दहातोंडे, डॉ. भावसार व प्रकल्पाचे ऋषिकेश बरे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी या प्रकल्पाचे प्रा. भारत पवार यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्यातील मु.पो. रावलापाणी, ता.तळोदा या गावातील आदिवासी वर्गातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button