भारत सरकार पब्लिक नोटरीपदी ॲड स्वाती गायकवाड यांची निवड
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : खा गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य सुभाष लिंगायत यांची कन्या ॲड. स्वाती गणेशराव गायकवाड (लिंगायत) यांची केंद्र सरकारकडून न्याय व विधी खात्याकडून नुकतीच पब्लिक नोटरीपदी निवड करण्यात आली आहे.
पुणे येथे प्रथितयश विधिज्ञ म्हणुन त्यांचा लौकिक असुन कमी वयात हे यश संपादन करून तिची पब्लिक नोटरीपदी निवड ही खुपच भुषणावह बाब आहे. विशेष म्हणजे माध्यमिक शिक्षण न्यु इंग्लिश स्कूल शिरसगाव व न्यु इंग्लिश स्कूल उक्कलगाव तर महाविद्यालयीन शिक्षण बोरावके काॅलेजमध्ये पूर्ण केल्यानंतर खा गोविंदराव आदिक लाॅ काॅलेज एलएलबी पदवी घेऊन डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ एलएलएम ची पदवी प्राप्त केली.
या नोटरीपदी निवडी बददल अतिथी काॅलनीचे माजी प्राचार्य प्रकाश देशमुख, ॲड बाबासाहेब मुठे, विलास कुलकर्णी, प्रदीप धुमाळ, दतात्रय रायपलली, पत्रकार चेडे, जेष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम, प्रभाकर भोंगळ, श्रीरामपूर पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष के एल खाडे, दामोदर जानराव, के पी बोराडे, आंतरभारती डाॅ प्रा बाबुराव उपाध्ये, प्रा आदिनाथ जोशी, प्राचार्य टी ई.शेळके, प्राचार्य शंकरराव अनारसे, लेविन भोसले आदी मान्यवरांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. तिचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.