अहिल्यानगर
आ. तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून वाघाचा आखाडा येथील शाळेस कम्प्युटर संच भेट
राहुरी | जावेद शेख : नूतन मराठी शाळा नं 3 वाघाचा आखाडा या शाळेस पदवीधर मतदार संघाचे आ. सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून एक कम्प्युटर संच प्राप्त झालेला आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश वाघ व सदस्यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या विशेष प्रयत्नाने शाळेस कॉम्प्युटर संच प्राप्त झाला. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानले असुन डिजिटल साक्षरता या बाबतीत विद्यार्थ्यांना यांचा निश्चितच उपयोग होणार आहे.