जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित – विजय नान्नर
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चितच मिळते, असे प्रतिपादन आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय नान्नर यांनी शिरसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात इ.12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणप्रसंगी प्रतिपादन केले.
यावेळी काॅलेजच्या प्राचार्या सौ.सुमती औताडे यांनी सांगितले की, माणसाची परिस्थिती कधीच शिक्षणाच्या आणि यशाच्या आड येत नाही. पुढे बोलताना विजय नान्नर म्हणाले की परीक्षेसाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा. आपण ग्रामीण असल्याचा न्यूनगंड काढून टाका. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात हुशार मुलांकरीता अनेक दालने खुली आहेत, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून हितेश वधवाणी यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ इ.12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे वाटप केले.
यावेळी शाळेचे पर्यवेक्षक विजय बडाख , सौ.दुधाट, सौ.कांबळे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राजन वधवाणी यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.आहिरे यांनी केले तर आभार राजन वधवाणी यांनी मानले. या कार्यक्रमाचे इ.11 वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख आणि सुंदर असे नियोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इ.11 वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.