महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक संवेदनशील व्यक्तिमत्व – सौ.धनश्रीताई विखे
राहुरीत शिवसेनेकडून महिला स्वच्छता दूत यांचा सन्मान
राहुरी : शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत अनेक आरोग्यदायी योजना अंमलात आणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे कुटुंब प्रमुख या नात्याने महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन सौ. धनश्रीताई सुजय विखे यांनी केले आहे.
राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी येथे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी आरोग्य शिबीर व मोफत रक्त तपासणी शिबीर तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सिंधुताई विखे पाटील रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई सुजय विखे पाटील या बोलत होत्या. यावेळी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा अश्विनी कल्हापुरे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख वनिता जाधव, वैशाली शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना सौ.धनश्रीताई विखे पाटील म्हणाल्या की, सर्व महिला भगिनींनी आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करून घ्यावी. महिलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. महिलांनी आपल्या कुटुंबाबरोबर आपली देखील काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांनी सकारात्मक विचार केल्यास मानसिक त्रास कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सामाजिक उपक्रमात महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी प्रास्ताविक भाषणात शिवसेना प्रमुख देवेंद्र लांबे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळावा या उद्देशाने सर्वरोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच आयुष्यमान भारत योजने अंतर्गत रु.५ लक्ष पर्यंतचा विमा देखील नोंदविण्यात येत आहे. ना.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही अवास्तव खर्च करण्यात येवू नये जनतेच्या हिताचे कार्यक्रम घेण्याच्या सूचना शिवसेना कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहेत, असे देवेंद्र लांबे म्हणाले. यावेळी अश्विनी कल्हापुरे, आरोग्य अधिकारी डॉ.सोनाली अंत्रे, राजश्री घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले.
सार्वजनिक कार्यक्रम म्हंटल कि नेते कधीच वेळेवर पोहचत नाहीत, परंतु सौ.धनश्रीताई विखे पाटील यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी दिलेल्या वेळेत उपस्थित राहत वेळेचे शिस्तीचे नियोजन कसे असावे याचा संदेश कार्यक्रमाला आलेल्या महिलांना घालून दिला.
या कार्यक्रमास विद्या अरगडे, ज्योती नालकर, ज्योती वर्पे, पूनम शेंडे, सुवर्णा सप्रे, पल्लवी वामन, प्रियंका जाधव, रोहिणी कोल्हे, अनुपमा सातभाई, वर्षा घाडगे, राणी घाडगे, रुपाली दळे, प्रतिभा घाडगे, श्रुती वर्पे, मनीषा अरगडे, ज्योती अरगडे, मनीषा बोबडे, युवासेना तालुका प्रमुख वैभव तनपुरे, तालुका संपर्क प्रमुख अशोक तनपुरे, अनिल आढाव, रोहित नालकर, सारंगधर साठे, वसंत कदम, बाळासाहेब कदम, ज्ञानेश्वर सप्रे, ज्ञानेश्वर जाधव, बापुसाहेब काळे, प्रमोद झिने, अजित ससाणे, मेजर नामदेव वांढेकर, आबासाहेब येवले, अमोल थोरात, भास्कर सांगळे, अशोक शेटे, अक्षय तनपुरे, मधुकर पोपळघट आदींसह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संघटक महेंद्र उगले यांनी केले तर आभार जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब म्हसे यांनी मानले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला आहे. याच विषयास अनुसरून राहुरी शहरातील नगरपालिका महिला स्वच्छता दूत यांच्या स्वच्छतेमुळे शहरात रोगराई कमी होते, त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून त्यांना साडी देवून सन्मानित करण्यात आले आहे.
श्री. देवेंद्र लांबे पाटील, शिवसेना राहुरी तालुका प्रमुख