प्रासंगिक

पेमगिरीतील शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांचे असेही दातृत्व

संगमनेर | बाळासाहेब भोर : स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीतील जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या सुसज्य अशा नुतन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास जात आहे. या शैक्षणिक कामात आजपर्यंत संपूर्ण गावकरी व या विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर या सर्वांनी मोठा हातभार लावला आहे.

या विद्यालयाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यादृष्टीने या विद्यालयाचे माजी विद्यार्थी पेमगिरी गावचे सुपुत्र सध्या नांदेड येथे स्थायिक असणारे सेवानिवृत्त आरटीओ अधिकारी अनिलकुमार अनंतराव पाराशर यांनी विद्यालयाच्या जीर्णोद्धारासाठी नुकतीच अकरा हजार रुपये देणगी दिली. मात्र एवढ्यावरच ते थांबले नाहीत. विद्यालयाच्या बाकी राहिलेल्या कामाची त्यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली व यापुढील कामात योग्य ते सहकार्य करण्याची ग्वाही शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक प्रकाश गोडसे यांना दिली.

या शैक्षणिक कामाची माहिती त्यांनी आपल्या मित्रांनाही दिली. इमारतीच्या राहिलेल्या कामासाठी त्यांनी आपल्या मित्रपरिवाराकडून दहा लाख रुपये देणगी जमा करून देण्याची संकल्पना याप्रसंगी मांडली. शाळेसाठी दहा लाख रुपये निधी जमवून देण्याचा त्यांचा मनोदय आहे. सुरुवातीपासूनच त्यांना आध्यात्मिक व शैक्षणिक बाबतीत अंतःकरणातून ओढ आहे. तसेच त्यांचा मुलगा व सुन दोघेही हैद्राबाद येथे डॉक्टर म्हणून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या मातृभूमीसाठी स्वेच्छेने शैक्षणिक दातृत्व दाखविणाऱ्या व गावच्या मातीशी घट्ट नाळ जपणाऱ्या अशा रत्नांची व सशक्त विचारांची सामाज्याला आज नितांत गरज आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button