अहिल्यानगर
शिरसगाव येथे प्रजासत्ताक दिनी यादव परिवाराच्या वतीने स्वर्गरथ लोकार्पण

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथे ग्रामपंचायत उपसरपंच संजय यादव यांच्या संकल्पनेतून यादव परिवाराच्या वतीने व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गणेशराव मुदगुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनी नागरिकांच्या सोयीसाठी स्वर्गरथ लोकार्पण नुकतेच करण्यात आले. यापूर्वी शिरसगाव येथे स्वर्गरथ नव्हता. दूरवरून येणाऱ्या नागरिकांची सुविधा उपलब्ध झाली. याप्रसंगी सरपंच राणीताई वाघमारे, उपसरपंच संजय यादव, तंटामुक्ती अध्यक्ष अशोकराव पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील ग्रामस्थ व यादव परिवार उपस्थित होता.