अहिल्यानगर

श्रीरामपूर जिल्हा होईपर्यंत श्रीराम नामजप चालूच ठेवणार – राजेंद्र लांडगे

श्रीराम तारक मंत्र नामजपास उस्फूर्त प्रतिसाद

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – बेचाळीस वर्षांपासून प्रलंबित श्रीरामपूर जिल्हा मागणी अंतिम टप्प्यात आहे. श्रीरामपूर जिल्हा चळवळ यशस्वी झाली पाहिजे म्हणून श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने अयोध्या येथून आणलेल्या राजारामाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला.

राम हा मंत्र स्वतःमध्ये पूर्ण असून हा तारक मंत्र आहे. श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे म्हणून श्रीराम नामाचा २२,२२२ वेळेस नामजपाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. श्रीरामपूर जिल्हा घोषीत होईपर्यंत श्रीराम नामजप पुढील टप्प्यात गावागावात व्हायला पाहिजे असे प्रतिपादन श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती व पसायदान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी यावेळी केले आहे.

श्रीरामपूर-बेलापूर रोडवरील यमुना ट्रेडर्ससमोर नाम जपास शहरातील सर्व पक्षीय सामाजिक संघटनेने उस्फूर्तपणे लोकसहभाग नोंदविला. यावेळी श्रीरामपूर वकील संघ उपाध्यक्ष ॲड. सुभाष जंगले, काँग्रेस नेते ज्ञानेश्वर मुरकुटे, समिती कार्याध्यक्ष भागचंद औताडे, प्रसिद्ध आर्किटेक के के आव्हाड, मनोज आगे, रामभाऊ औताडे, यमुनाबाई जंगले, तेजश्री जंगले, ॲड. शामराव खर्डे, ॲड राजेंद्र भोसले, ॲड बोर्डे, ॲड कोकणे, ॲड गवारे, ॲड गांधी, ॲड मधुकर भोसले, पोलीस पाटील अभिजित बोर्डे, शिवाजी भोसले, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष युवराज जगताप, बाबासाहेब चेडे, किशोर फाजगे, प्रभाकर जऱ्हाड आदींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकसहभाग नोंदवला.

यावेळी राजेंद्र लांडगे म्हणाले की श्रीरामपूर जिल्हा हा प्रतिष्ठा आणि भावनिक होत चालला आहे. साठ हजार वर्ष अहिल्या शिळा होऊन पडली होती. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्या शाप मुक्त झाली. तसे देशातील प्रभू श्रीरामाच्या नावाने पावन झालेले एकमेव श्रीरामपूर शहर शाप मुक्त होण्यासाठी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीने तीन महिन्यांपूर्वी श्रीरामालाच साकडे घातले होते. सर्व जनतेला खात्री आहे की श्रीरामपूर जिल्हा होण्याची शक्ती श्रीरामात आहे. अयोध्या प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने शासन २२ जिल्ह्याचे विभाजन करून २६ जानेवारी मुहूर्तावर श्रीरामपूर जिल्हा शंभर टक्के करतील असा आत्मविश्वास लांडगे यांनी शेवटी व्यक्त केला.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button