कृषी

बारामती येथील कृषिक २०२४ प्रदर्शनातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या स्टॉलला शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद

राहुरी | जावेद शेख : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचा बारामती येथील दि. १८ ते २२ जानेवारी, २०२४ दरम्यान आयोजीत कृषिक २०२४ कृषि प्रदर्शनात सहभाग घेऊन जागतिक बँक अर्थसाहित, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली पुरस्कृत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापन प्रकल्पाने तयार केलेले नाविन्यपूर्ण अविष्कार प्रदर्शित केले असून या प्रात्यक्षिकांना शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

राहुरी कृषि विद्यापीठाच्या या प्रदर्शन स्टॉलला कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. विद्यापीठाने उभारलेल्या या प्रदर्शनात व ड्रोन, ऑटो पी.आय.एस., स्मार्ट पी.आय.एस. स्वंयचलीत पंप प्रणाली, अद्ययावत हवामान केंद्र आणि सेंसर आधारीत सिंचन प्रणाली या तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. डॉ.दगडू पारधे, इंजि. अभिषेक दातीर, इंजि. शुभम सिंग, अजिंक्य आढाव यांनी मान्यवरांना व उपस्थित शेतकर्यांना या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली.

सदर प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, प्राध्यापक डॉ. मुकुंद शिंदे, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक व प्रदर्शनाचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button