अहिल्यानगर

सम्राट असंघटित बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने किरणताई जाधव यांचा सत्कार

राहुरी : सम्राट असंघटित बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त जेडी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मुख्य संपादक किरणताई जाधव यांचा अध्यक्ष चंद्रकांत बागुल यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी विलास अहिरे, शंकरराव बिराडे, सम्राट असंघटित सेवाभावी संस्थेचे सचिव विलास जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर कोकाटे, संस्थेचे सल्लागार राहुल सोनवणे, संस्थेचे खजिनदार दत्तात्रय दांडगे, दीपमालाताई जाधव तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांचे आभार मानत मुख्य संपादक किरणताई जाधव यांनी सर्व उपस्थितांना जेडी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे वाटप केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button