अहिल्यानगर
स्वराज्य पोलीस मित्र माहिती आधिकार पत्रकार संरक्षण समिती कडून डिग्रस येथे कोरोना योध्दयांचा सन्मान
कोरोना योद्धा सन्मान वितरण कार्यक्रम प्रसंगी कृष्णा गायकवाड, क्रांतीसेनेचे संदीप ओहोळ, सरपंच पोपट बर्डे व सचिन दिघे आदी मान्यवर.
राहुरी प्रतिनिधी : स्वराज्य पोलिस मित्र,माहीती आधिकार कायदा पत्रकार संरक्षण संघटणेमार्फत राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर आरोग्य केंद्र व डिग्रस आरोग्य केंद्र येथील डॉक्टर ,आरोग्य सेविका,आशा सेविका, ग्रामविकास अधिकारी,ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी भारतीय पत्रकार संघटनेचे जिल्हा प्रमुख कृष्णा गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे,डिग्रस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे,क्रांतीसेनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, सचिन पवार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भारत नजन, संघटक संतोष जावळे, सचिव सदाम पटेल, डिग्रस ग्रामपंचायत सरपंच पोपट बर्डे, ग्रामविकास अधिकारी डोंगरे, डॉक्टर गौरी दळवी, आरोग्य सेविका वांढेकर, सर्पमित्र राहुल गायकवाड, आशोक मंडलिक, आर आर जाधव, आशा सेविका व इतर मान्यवर उपस्थित होते.