क्रीडा

नेपाळ येथील युथ गेम्स क्रीडा स्पर्धेत मुसळवाडीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

राहुरी – पोखरा येथे चालु असलेल्या इंडो- नेपाळ युथ गेम्स इंटरनेशनल चॅम्पियन २०२३ च्या कबड्डी खेळात रंगशाला कबड्डी स्टेडियमवर मुसळवाडी येथील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत मुसळवाडी गावाचे नाव पहिल्यांदाच इतिहासाच्या पटलावर कोरले.

अशी उल्लेखनीय कामगिरी करणारा खेळाडू पवार दत्तात्रय राजू व झुगे सिद्धार्थ देवेंद्र यांनी 21 वर्षाच्या वयोगटात कबड्डी या खेळात उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावले. तसेच या खेळाडूंची असियन युथ गेम्स इंटरनॅशनल सिरीज 2023, ठिकाण थायलंड येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता निवड झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.पी.पी. सुर्यंवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. परिसरातील क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button