सोनई गावात ‘कृषि महाविद्यालय भानसहिवरे’ येथील कृषिदुतांचे आगमन
सोनई : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्नित असलेल्या सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत कृषि महाविद्यालय, भानसहिवरे येथील ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम रावे (RAWE & AIA) अंतर्गत सोनई येथे कृषिदूतांचे आगमन झाले. या निमित्ताने सोनईचे ग्रामप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रम अंतर्गत कृषिदुत – खळेकर शिवराज, कोतकर हर्षल, शेडगे शुभम, निरपळ विराज हे पुढील काही दिवस गावात राहून परिसरातील शेतकर्यांशी संपर्क साधून अनेक प्रात्यक्षिके व उपक्रम राबविणार असून यातुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच, व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. तूरभटमट सर तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. एम. आर. माने व कार्यक्रम अधिकारी प्रा. महाजन, प्राध्यापिका खकाळे, प्रा. सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभले.