अहमदनगर

प्राचार्य फा. डॉमनिक सेवापुर्ती सोहळ्यास महागुरूस्वामीसह अनेकांचे सत्कार व शुभेच्छा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : संत तेरेजा उच्च माध्यमिक विद्यालय हरेगाव या ठिकाणी शाळेचे प्राचार्य रे.फा. डॉमिनिक रोझारिओ यांचा सेवापुर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या सोहळ्यासाठी नाशिक कॅथोलिक धर्मप्रांताचे महागुरूस्वामी रा.रे.डॉ.लूड्स डॅनियल हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्याचबरोबर संस्थेचे माजी सचिव संत जोसेफ केंदळ येथील मुख्याध्यापक रे.फा.राजेंद्र लोंढे व तसेच शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती श्रीरामपूर येथील संजीवन दिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फादर डॉमिनिक यांनी प्रजा जागृती शिक्षण संस्थेमध्ये जवळपास वीस वर्ष सेवा केली. केंदळ येथील संत जोसेफ स्कूल तसेच झेविअर इंग्लिश मीडियम स्कूल राहाता व संत तेरेजा उच्च माध्यमिक विद्यालय व बॉईज हायस्कूल हरेगाव या ठिकाणी त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले. त्याचबरोबर प्रजा जागृती शिक्षण संस्थेची सचिवपदही त्यांच्याकडेच आहे. संस्थेचे अध्यक्ष नाशिक कॅथोलिक धर्म प्रांताचे महागुरूस्वामी लूरड्स डॅनियल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर सेवापुर्ती कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रे.फा. डॉमिनिक रोझारिओ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रे फा. डॉमिनिक रोझारिओ यांचे बंधू फिलीप रोझारिओ, त्यांची पुतणी जयसिलता व नात सिया, इटली देशावरून आलेले त्यांचे जावई संजय डिगुना, त्यांचे पुतणे शालन युनायटेड किंगडम या देशातून आलेले होते. तसेच त्यांच्या सुनबाई निकिता ताई, मोठ्या भावापेक्षाही जास्त प्रेम देणारे त्यांचे मार्गदर्शक मित्र शोरूप वसईकर, राहता धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे. फादर गिल्बट दिनिस, रे.फा.आनंद बोधक, प्रजा जागृती शिक्षण संस्थेचे सचिव रे. फा. फ्रान्सिस ओहळ, आशादीप इंग्लिश मीडियम स्कूल सुरेगाव पान येथील प्रिन्सिपल रे. फादर पाॅली डिसिल्वा, आशादीप इंग्लिश मीडियम स्कूल सुरेगाव पान येथील प्रिन्सिपल रे. फादर पाॅली डिसिल्वा, सोनगाव धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. परेरा, संत तेरेजा गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर गजभिव, पानोडी येथील सिस्टर्स शैला व त्यांचा ग्रुप, संत तेरेजा धर्मग्रामाचे रे. फा. सचिन, रे.फा.रिचर्ड अँथोनी, प्रजा जागृती शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेचे सर्व मुख्याध्यापक, संत तेजा प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेचे सर्व सेवानिवृत्त शिक्षक देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

संत तेरेजा शैक्षणिक संकुलातील मुख्याध्यापक चित्ते, सुपरवायझर बलमे व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वाती पारखे यांनी केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button