अहिल्यानगर

मोबाईल फोन हॅक प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना युवा ग्रामीण पत्रकार संघाचे निवेदन

नगर : राहुरी तालुक्यातील पत्रकार तसेच नागरिकांचे मोबाईल फोन हॅक प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना युवा ग्रामीण पत्रकार संघाने निवेदन देत गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

तालुक्यात युवा ग्रामीण पत्रकार संघाची रविवारी ३ डिसेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी एक दिवस अगोदर २ डिसेंबर रोजी तालुकाध्यक्ष अशोक मंडलिक यांचा फोन हॅक करत ते सहभागी असलेल्या गृपवर अश्लील संदेश पाठविण्यात गेले होते. त्याचप्रमाणे अन्य नागरिकांचेही तालुक्यातून मोबाईल फोन हॅक करण्यात आले आहेत. सध्या फोन हॅक करण्याचे प्रमाण वाढत असून नागरिकांची या प्रकाराने डोकेदुखी वाढत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष महेश भोसले, नाशिक विभागीय अध्यक्ष शरद तांबे, जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले, उपाध्यक्ष उमेश साठे, शहराध्यक्ष अशोक तांबे, उपाध्यक्ष रोहित गांधी, सुभाष कोंडेकर आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर गुन्हे विभागाचे प्रतीक कोळी यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली. 

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button