दिल्ली येथील ७ डिसेंबरच्या देशव्यापी आंदोलनास श्रीरामपूर येथून पेन्शनधारक रवाना
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : पेन्शन धारकांच्या प्रलंबित पेन्शनवाढी प्रश्नासाठी केंद्रीय कामगार मंत्री, अर्थमंत्री, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने अद्याप निर्णय न घेतल्याने देशातील सर्व इपीएस पेन्शनधारक दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून रामलीला मैदान नवी दिल्ली येथे राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत, पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण आंदोलन करणार आहेत. तसेच ८ डिसेंबर पासून २४ डिसेंबरपर्यंत जंतर मंतर येथे साखळी उपोषण करणार आहेत. इपीएस पेन्शन फंडामध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षअखेर रु ७८०३०८.९३ कोटी जमा आहेत. त्यातून किमान रु ७५००/- दरमहा पेन्शन, दरवाढीची महागाई मिळू शकते, असे असून निर्णय नाही. त्यासाठी श्रीरामपूर येथून शेकडो पेन्शन धारक मंगळवारी रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्यांना तालुकाध्यक्ष राधाकृष्ण धुमाळ व सहकारी यांनी सुभाष पोखरकर, बी आर चेडे, जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, भगवंत वाळके, सोमनाथ खाडे, सुकदेव सोनावणे, अशोक राउत, चिमाजी सातपुते, सारंगधर गडाख आदींचा रेल्वे स्टेशनवर पुष्पहार देऊन सत्कार केला व प्रवासास शुभेच्छा दिल्या.