महाराष्ट्र
समाज कल्याण आधिकारी कोकाटे यांचा सत्कार

आरडगाव प्रतिनिधी / राजेंद्र आढाव : सहायक आयुक्त समाज कल्याण अहमदनगर कार्यालयाचे विशेष आधिकारी देविदास कोकाटे यांची समाज कल्याण अधिकारी ( गट ब ) प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालय, नाशिक येथे बदली झाल्याने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. अनुदानित वस्तीगृह संस्था चालक अधिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने रामकरण सारडा विद्यार्थी वस्तीगृह अहमदनगर येथे कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक धनाजी शिंदे हे होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य अनुदानित वस्तीगृह संस्था चालक महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब भोईटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे बहुजन शिक्षण संस्था अहमदनगरचे बैचे सर, जिल्हा परिषद अहमदनगरचे विस्तार अधिकारी पाराजी निमसे, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक प्रकाश साठे, जिल्ह्यातील अधिक्षक प्रकाश धोंडे, विश्वास कुताळ, तोडमल सर, जाधव सर, कामठे सर, बंडु भोसले सर अधिक्षक रामकरण सारडा आदी उपस्थित होते.