भाजप अनु.जाती मोर्चा अध्यक्षपदी त्रिभुवन यांची नियुक्ती
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरेगाव येथील प्रभारी सरपंच दिलीप त्रिभुवन यांची ना.राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा सरचिटणीस नितीनराव दिनकर व दीपक पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या उत्तर नगर जिल्हा अनु.जाती मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तशा निवडीचे पत्र भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी दिले आहे.
या निवडीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडून विविध विकास योजना राबवून गोरगरीबांना जे भरीव योगदान देत आहेत व देशाला त्यांचेशिवाय पर्याय नाही हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मला पक्षात सेवा करण्याची संधी दिली. त्या माध्यमातून हरेगाव परिसरात विविध विकास कामे करण्यास सहकार्य मिळेल. जिल्हाध्यक्ष निवडीबद्दल त्यांचे ग्रामपंचायत सदस्य रमेश भालेराव, अतुल भालेराव, सचिन गांगुर्डे, कोमल जाधव, अंकुश सातुरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.