अहिल्यानगर
मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान राहुरी तालुक्यातील बसेसच्या फेऱ्या थांबवा
राहुरी : मराठा समाजाचे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू असून आंदोलनाच्या आडून जर कोणी एसटीचे नुकसान केल्यास मराठा आंदोलकांचा त्या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसेल, अशा आशयाचे निवेदन मराठा आंदोलकांकडून राहुरी बस स्थानकाचे वाहतूक निरीक्षकांना देण्यात आले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान जिल्ह्यात एसटी बसवर हल्ला करून नुकसान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राहुरी तालुक्यातील एसटी बसच्या सर्व फेऱ्या बंद करण्यात याव्यात, अशी मागणी सकल मराठा समाज, मराठा एकीकरण समिती व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.