छत्रपती संभाजीनगर
पाचोड महसुल मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठीही भुमिगत..
विजय चिडे/ पाचोड : चार दिवपापूर्वी पाचोड पासुन हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कडेठाण ता.पैठण येथिल एक तलाठ्यासह कोतवालास सोमवारी दि.२७ सप्टेंबर रोजी पंधरा हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यासह कोतवालास रंगेहाथ पकडण्यात आले होते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे सोमवारी करण्यात आली होती तेव्हापासून पाचोड येथिल महसुल मंडळातिल पाचोडसह लिंबगाव, थेरगाव, मुरमा, राजंगाव, आंतरवाली खांडी, दादेगाव बु,खू,हर्षी, वडजी, आडगाव, एकतूनीसह परिसरातील तलाठीसह मंडळ अधिकारी भुमिगत झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
सध्या शेतकऱ्यांना शेतीविषयक लागणारा सातबारा आणि शालेय विद्यार्थ्यांना लागणारा उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी मंडळ कार्यालय तसेच तलाठी कार्यालयाची पायपीट करावी लागत असल्याचे पाहावयास मिळत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांची शेतीविषयक कामे गावातच व्हावीत यासाठी प्रत्येक मंडळ परिसरात मंडळ कार्यालय तसेच प्रत्येक सजाकरिता तलाठी कार्यालयासह निवासाची व्यवस्था केली आहे; परंतु पाचोड ता.पैठण येथिल मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठी उपस्थित राहत नसल्यामुळे या सजांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीविषयक लागणाऱ्या सातबारासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांना लागणाऱ्या उत्पन्न प्रमाणपत्रासाठी अनेकदा चकरा मारूनही तलाठी उपस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांसह, विद्यार्थ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सध्या पावसाने तालुक्यात हाहाकार माजवला असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पूर्ण पणे पाण्याखाली गेली असल्याने शासनाने महसुल, विभाग व कृषी विभागाला घटनास्थळी जावून पंचनामा करण्याचे आदेश दिले गेले असतानाही मंडळ अधिकारी व तलाठी परिसरात सापडत नसल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. तलाठी कार्यलयात शेतकऱ्यांची नावे लिहून दुसऱ्या दिवशी येण्यास सांगतो. दुसऱ्या दिवशी शेतकरी जातात तर तलाठी आलेच नाही असे म्हणून शेतकऱ्यांना परत पाठविले जाते. या प्रकारामुळे शेतकरी त्रासून गेले आहेत. वारस फेरफारसाठी पंधरा हजाराची लाच घेताना कडेठाण सजाचा तलाठी व कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आडकले तेव्हाच पाचोड मंडळातर्गांत तलाठ्यास पैठण तालुक्यातील सर्व तलाठी भुमीगत झालेत यात काय गुपीत दडल हे मात्र अनुत्तरीत आहे. वारस फेर घेण्यासाठी कडेठाण येथिल तलाठ्यासह कोतवालास पंधरा हजार रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले अन् पाचोड मंडळातर्गत सर्व तलाठी भुमिगत झाले यावरुन त्याची प्रमाणिकता सिध्द काय होणार ? त्याला कर नाही त्याला डर कसला बाकीचे तलाठी मंडळ अधिकारी ऐन नैसर्गिक आपत्तीच्या काळात मुख्यालय सोडून भुमिगत होणे हे न उलगडले कोडे आहे. गेल्या आठ महीन्यापासून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या डेस्कवर वारस फेर, अन्य नोंदी च्या फाईली चिरीमिरी न दिल्यामूळे धुळखात पडून आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.
कागदपत्रांसाठी पायपीट….सातबारा, उत्पन्नाचा दाखला, गाव नमुना आठ आदी कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांकडून प्रती कागद २० रुपये वसुली केली जात असून, त्याची कसलीही पावती देत नाही किंवा कोणत्याही रजिस्टरवर नोंद करीत नाही. असा आरोप शेतकरी करत आहे. सध्या शालेय विद्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्राची अत्यंत गरज आहे. परंतु तलाठी उपस्थित राहत नसल्यामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन येथील कार्यरत तलाठ्यांसह मंडळ अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.