पवित्र मारीयेचे प्रेषितीय कार्य जगाच्या समाप्तीपर्यंत राहील- फा.अंतोन डिसोझा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरेगाव येथील मतमाउली भक्तिस्थान येथे यात्रापूर्व आठवा नोव्हेना संपन्न झाला. त्यावेळी आठवे पुष्प पवित्र मारिया ख्रिस्तसभेतील प्रेशितीय कार्य या विषयावर प्रबोधन करताना सांगितले की, आज पवित्र मारियाच्या सन्मानार्थ जमलो आहोत. मरिया ही देवाकडून निवडलेली बाई होती. देवाने तिला सर्व सन्मान दिले आणि म्हणून तिला पिढ्यानपिढ्या या जगात सन्मान देतील.ध
तिने देवाचे प्रेषित कार्य सुरुवातीपासूनच केले. जसे एक स्त्री एक माता आपल्या पोटात नऊ महिने बाळाला ठेवते व पालन पोषण करते, त्याचप्रमाणे तिनेही प्रभू येशू ख्रिस्ताचे पालन आपल्या पोटात केले. परमेश्वराने निवडलेली ही बाई परमेश्वर तिच्याव्दारे जन्मला. तिने जगाला तारणारा म्हणून हा दिला. तिने त्यापासून ते आतापर्यंत प्रेषितीय कार्य केले. देवाची योजना काय आहे हे तिला पूर्णपणे ठाऊक होते. म्हणून ती देवाच्या आज्ञेप्रमाणे शेवटपर्यंत वागली. तिला त्याचे जन्मापासून जाणीव होती की तो प्रभू येशू आहे, सर्वांना तारणारा आहे. पापमुक्त करणारा आहे.
तिने सर्व लोकांना हा संदेश दिला की देवाच्या आज्ञा पाळणे, ती म्हणाली मी प्रभूची दासी आहे. शब्दाप्रमाणे माझ्या ठायी होवो. प्रभू येशू ख्रिस्त सांगेल त्याप्रमाणे करा. तिने आजपर्यंत प्रेशितीय कार्य केले. आज तिच्या नावाने आज सर्वत्र लोक जमतात. प्रार्थना करतात व तिच्या नावाने देवाचे कार्य करतात, तिच्या नावाने संसार उभारले आहेत. शाळा उभारल्या, अनेक कार्य घडत आहे. देव जे सांगतो ते आपण करायचे आहे. त्याच्या शब्दाप्रमाणे आपल्या ठायी होवो. हे प्रेषित कार्य जगाचे समाप्तीपर्यंत राहील. मरिया आपल्या प्रत्येक व्यक्तीला देवाचा ख्रिस्ताचा मार्ग दाखविते. तोच सत्य आहे, तोच मार्ग आहे तेच जीवन आहे…
या नोव्हेनात फा. पीटर डिसोझा, मायकल वाघमारे, संजय पंडित, संदीप जगताप, प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक, रिचर्ड, सचिन आदी सहभागी होते. दि ८ सप्टेंबर रोजी फा. जेरोल्ड रिबेलो यांनी पवित्र मारिया नम्रतेचा परमोच्च आदर्श या विषयावर प्रबोधन केले. यावेळी सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी यांचा सन्मान करण्यात आला. पावसाला सुरुवात झाल्याने शाळेसमोर भव्य मंडप व पेवर ब्लॉक असल्याने पावसाचा भाविकांना त्रास होणार नाही. मतमाउली यात्रा अमृत महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक रोझारिओ यांनी केले आहे.