अहिल्यानगर

मनुष्याचे हित निसर्गाच्या सानिध्यात – शिवाजीराजे पालवे

जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून धारवाडीची स्मशानभूमी फुलणार हिरवाईने

पाथर्डी – पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या वृक्षरोपण अभियानातंर्गत धारवाडी, ता. पाथर्डी येथे वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली. फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिक उजाड डोंगर, पर्वत रांगा व गाव पातळीवर वृक्षरोपण अभियान राबवित असून, धारवाडीची स्मशानभूमी परिसर झालेल्या वृक्षरोपणाने हिरवाईने फुलणार आहे.

या वृक्षरोपण अभियानाप्रसंगी धारवाडी गावातील निवृत्त पोलीस अधिकारी नवनाथ सोनवणे, माजी सैनिक बाबासाहेब गवळी, नामदेव काळापहाड, नवनाथ गिते, नवनाथ आव्हाड, अशोक काळापहाड, आंबादास गोरे, माजी सरपच भिमराज सोनवणे, युवा नेते बाळासाहेब पालवे, अशोक आंधळे, राजेंद्र आंधळे, सखाराम आंधळे, कुंडलिक गोरे, अर्जुन सोनवणे, राहुल शिरसाट, शिवाजी जाधोर, महेश सोनवणे, रामदास गोरे, मच्छिंद्र आव्हाड, भाऊसाहेब गोरे, प्रल्हाद आव्हाड, अशोक पालवे, आकाश सोनवणे, ईश्‍वर पालवे, कोल्हारचे सरपंच राजू नेटके, उपसरपंच गोरक्ष पालवे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पालवे, जय हिंदचे शिवाजीराजे पालवे, शिवाजी गर्जे, रोहीदास पालवे, गौरव गर्जे, शर्मा पालवे, भगवान पालवे, संतोष पालवे, विजय पालवे, मिठू पालवे, गोरक्ष पालवे आदी उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते स्मशान भूमीच्या परिसरात 21 वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली. मेजर बाबासाहेब गवळी यांनी ग्रामस्थांच्या वतीने लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी स्विकारली.

यावेळी निवृत्ती पोलीस अधिकारी नवनाथ सोनवणे म्हणाले की, जंगल तोड झाल्याने निसर्गचक्र बिघडले आहे. आजही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु असून, दुष्काळाचे सावट महाराष्ट्रापुढे उभे राहत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण व संवर्धन झाल्यास पर्यावरणाचे समतोल साधून, दुष्काळ देखील कायमचा हद्दपार होणार आहे. समाज व मानव जातीच्या कल्याणासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवाजी पालवे म्हणाले की, धारवाडी गावातील स्मशानभूमी हिरवीगार व निसर्गरम्य होणार आहे. मनुष्याचे हित निसर्गाच्या सानिध्यात असून, मात्र तो निसर्गाची हानी करुन त्यापासून लांब जात असल्याने अनेक गंभीर प्रश्‍न उद्भवत आहे. राष्ट्रीय वृक्ष म्हणून गावोगावी याची लागवड करण्याचे त्यांनी आवाहन केले. आभार सरपंच बापू गोरे व माजी सरपंच भिमराज सोनवणे यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button