क्रीडा

हरेगाव मतमाउली यात्रेनिमित्त १० व ११ सप्टेंबर रोजी भव्य पुरुष गट कबड्डी स्पर्धा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : सालाबादप्रमाणे संत तेरेजा क्लब हरेगाव यांच्या वतीने येत्या १० व ११ सप्टेंबर रोजी पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा संत तेरेजा चर्च प्रांगणात आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती संत तेरेजा क्लब अध्यक्ष बी सी मंडलिक यांनी दिली.

दि १० सप्टेंबर रोजी प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक, रिचर्ड, सचिन, आ.लहू कानडे सि ज्योती गजभिव, करण ससाणे आदींच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ होणार असून बक्षीस वितरण सोहळा आ.लहू कानडे, फा डॉमनिक, संगीता गायकवाड, अनुराधा आदिक आदींच्या उपस्थितीत होणार आहे. कबड्डी स्पर्धेत प्रथम पारितोषिक रु ४१०००/- श्रीमती सुंदरबाई गायकवाड यांच्या सौजन्याने व चषक अमोल शिंदे यांच्या सौजन्याने ठेवण्यात आले आहे.

व्दितीय रु ३१०००/- संजय गायकवाड यांच्या वतीने व चषक अमोल शिंदे यांच्या सौजन्याने, तृतीय रु २१०००/- अजय गायकवाड पुणे व चषक अमोल शिंदे यांच्या सौजन्याने, चतुर्थ रु १५०००/- डॉ. एजाज शेख यांच्या सौजन्याने, व चषक अमोल शिंदे यांच्या वतीने, पाचवे रु ७०००/- श्रीमती सुंदरबाई गायकवाड यांचेतर्फे, सहावे व सातवे प्रत्येकी रु ७०००/- प्रवीण आव्हाडतर्फे, आठवे रु ७०००/- मेजर शफिक सय्यद यांच्यातर्फे, उत्कृष्ट रायडरसाठी रु १०००/- उत्कृष्ट डीफ्रेडररु १०००/- सुनील थोरवे यांच्यातर्फे, रु २०००/- शिस्तबद्ध संघास सत तेरेजा क्लब यांच्या सौजन्याने, अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

पंच कमेटीत मान्यवर हम्पाय्रर आहेत. स्पर्धेसाठी इच्छुक संघांनी नोंदणी रविवार दि १० सप्टेंबर रोजी सकाळी ८:०० वा. करावी. प्रवेश फी रु ४००/- राहील. रविवारी सामने वेळेवर सुरु होतील. या कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्लब अध्यक्ष बी सी मंडलिक, मातृछाया हौसिंग सोसायटी, उंदिरगाव, उपाध्यक्ष डी एस गायकवाड, सचिव सुनील साठे, सहसचिव किशोर कदम, बाबुराव सूर्यवंशी, अनिल भनगडे, खजिनदार अशोक त्रिभुवन यांचेशी मो.क्र ९८५०९१६३९६, ८८०५७४८३९६, ९७६३४०४३२८, ९९२२७८०६९९, ९५६१३२१२२५ यावर संपर्क करावा, असे आवाहन संत तेरेजा क्लब यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button