शिरसगाव महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : न्यू. इंग्लिश स्कूल व कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय शिरसगाव येथे भारतीय स्वातंत्र्याचा ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या हस्ते व ॲड. गजानन केशवराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी शिरसगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, तलाठी, ग्रामसेवक, प्रशासकीय अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पालक, पदाधिकारी, प्राथमिक शाळा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, विद्यालयाच्या प्राचार्या, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी इयत्ता 10 वी. व 12 वी. बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. डॉ.सीताराम लबडे व सौ.प्रमिला लबडे यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ इयत्ता दहावी मध्ये प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
प्रा. बाळासाहेब थोरात यांचेकडून बारावी मध्ये प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आले. माजी पर्यवेक्षक भास्करराव ताके यांचेकडून त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ दहावी व बारावी वर्गातील मुलींमध्ये प्रथम व मुलांमध्ये प्रथम विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देण्यात आली.