सोनगाव येथे शिधापत्रिका वाटप
राहुरी | अशोक मंडलिक : तालुक्यातील सोनगांव येथील २५ आदिवासी बांधवाना आज आ. प्राजक्त तनपुरे यांचे प्रयत्नातुन शिधापत्रिका वाटप मा. नगराध्यक्षा तथा जिल्हा नियोजन समितीच्या मा. सदस्या डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना सौ.तनपुरे म्हणाल्या की, आ. प्राजक्त तनपुरे आदिवासी राज्यमंत्री असतांना आदिवासी कुटुंबांसाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात आल्या होत्या. कोरोना काळात किराणा किटचे वाटप, मानधन म्हणुन रु.२००० तसेच जातीचे दाखले, मोफत विज कनेक्शन आदि योजना प्रभावीपणे मतदार संघात राबविल्या. त्यानुसार आज २५ आदिवासी कुटुंबांना रेशन कार्डचे वाटप होत आहे. त्यामुळे या आदिवासी बांधवांच्या कुटुंबाना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळणार आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेश चिटणीस मिलींद अनाप, मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब खुळे, पंचायत समितीचे मा.सदस्य सचिन भिंगारदे, नरेंद्र अनाप, किशोर कातोरे, चंद्रकांत कदम तसेच आदिवासी लाभार्थी विजय मोरे, दिपक मोरे, शाम मोरे, रविंद्र मोरे, अनिल मोरे, सौ.शोभाताई मोरे, सुनिल मोरे आदींसह आदिवासी बांधव उपस्थित होते.