महसूल सप्ताहानिमित्त उपअधीक्षक भूमी अभिलेख राहुरी कार्यालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन
राहुरी : महसूल विभागाशी संबंधित सामान्य नागरिकांच्या तक्रारी तसेच अर्जावर काल मर्यादेत निपटारा होऊन सर्वसामान्य जनतेला अधिक चांगली व दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने १ ऑगस्ट महसूल दिनानिमित्ताने राज्यात ‘महसूल सप्ताहा’चे आयोजन राज्य शासनाच्या वतीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली“लोकाभिमुख कामांचा करुनी निपटारा; चला करुया महसूल सप्ताह साजरा” या ब्रीद वाक्याने या महसूल सप्ताहाचा शुभारंभ उपअधीक्षक भूमी अभिलेख राहुरी कार्यालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करुन करण्यात आला.
महसूल सप्ताह प्रारंभ दिनी उपअधीक्षक भूमी अभिलेख राहुरी कार्यालयाकडून कोळेवाडी, ता. राहुरी येथील स्मशान भूमी जागेस नवीन गट नंबर देवून सदर जागेचा नकाशा गावचे सरपंच जालिंदर घीगे यांना प्रदान करण्यात आला. तालुक्यातील माहेगाव दरडगाव तर्फे बेलापूर, तीळापूर येथे सनद वाटप कॅम्प आयोजीत करून सनद वाटप करण्यात आले. ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमांतर्गत देवळाली प्रवरा येथील माजी सैनिक दत्तात्रय भाऊसाहेब कडू यांना राहण्याच्या जागेसाठी मोजणी करून खुणा करून देण्यात आल्या. तसेच युवा सवांद कार्यक्रमांतर्गत तरुण वर्गासाठी रोवर यंत्राद्वारे मोजणी कामाचे प्रात्यक्षिक व गावठाण चौकशी कामाची माहिती त्याचप्रमाणे निवृत्त अधिकारी, कर्मचारी त्यांचे कुटुंबीय यांना बोलावून सन्मानित केले जाणार असल्याने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
अहमदनगर भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक सुनिल इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या व्यापक अभियानातून विशेष मोहीमेद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडवितानाच विभागाचे लोकाभिमुख काम गतिमान करण्यासाठी अभियानात सामान्य नागरिकांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन उपअधीक्षक सुनिल कडू यांनी केले आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्यालय सहाय्यक कटारे, शिरस्तेदार लकारे, परिरक्षण भूमापक ताटी निमतानदार खेमनर, पटारे, गवळी, भूकरमापक खोसे, कुलकर्णी, नल्ला, पाटील, गांगुर्डे, मानकर, वारघुसे, लोखंडे, भिसे, बारस्कर, साठे, देशमुख आदींनी परीश्रम घेतले.