शिवछत्रपती कला महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. हेमंत जैन यांनी इंग्रजी भाषा शिकण्याचे कौशल्य सांगून कोणतीही भाषा शिकण्यासाठी अडीच हजार शब्दसाठा आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर इंग्रजी भाषा शिकण्यासाठी शाळा, महाविद्यालय तसेच कुटुंब यामध्ये संबंधित भाषेचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले! अध्यक्षीय समारोप करताना अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. यादव यांनी समृद्ध भाषेमुळे कोणत्याही समाजाचा तसेच देशाचा विकास होतो. कोणत्याही देशाची संस्कृती बघायची असेल तर त्या देशाच्या भाषेचा अभ्यास आवश्यक आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विषयाचे प्रा सचिन कदम यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप हिंदी विषयाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. जाधव यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. चव्हाण, प्रा. डॉ. जायभाये, प्रा. डॉ. पोटभरे, प्रा. डॉ. बिडवे, प्रा. डॉ. महाजन, प्रा. साताेनकर, प्रा. गावंडे, प्रा. कांबळे, प्रा. डॉ. देखणे, श्री. इंगळे तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.