मुख्यमंत्री शिंदे सर्वसामान्य जनतेचा विचार करणारे नेते – बाबुशेठ टायरवाले
शिवसेना तालुका प्रमुख लांबे पाटील यांचे काम नगर जिल्ह्यात अव्वल - कृष्णा काळे
राहुरी – शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेचा विचार करणारे नेते असल्याचे मत शिवसेनेचे दक्षिण नगर जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी राहुरी येथे पार पडलेल्या बैठकीत व्यक्त केले.
राहुरी स्टेशन रोडवरील व्यंकटेश मंगल कार्यालय येथे नुकतीच शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले हे बोलत होते. या बैठकीस मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे जिल्हा समन्वयक कृष्णा काळे, महिला जिल्हाध्यक्ष डॉ.शबनम इनामदार, उपजिल्हाप्रमुख जयवंत पवार, सांप्रदायिक आघाडीचे जि.प्र.संपत जाधव, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख दिपक जंजिरे, श्रीरामपूर महिला आ.ता.प्र.पूनम जाधव, शिवसेना राहुरी ता.प्र. देवेंद्र लांबे, महेंद्र शेळके, रोहित नालकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले म्हणाले कि, आम्ही शिवसेना स्थापनेपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करत आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या प्रत्येक कृतीतून सर्वसामान्य जनतेचा विचार करतात हे अधोरेखित होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांची प्रेरणा घेवून खा.सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी जनतेचे कामे करावीत. शिवसैनिकांच्या सुख-दुखात जिल्हाप्रमुख या नात्याने मी सदैव उभा आहे, असे बाबुशेठ टायरवाले म्हणाले.
जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागात राबवून घेण्यासाठी व प्रशासकीय पातळीवर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शिवसैनिक काम करत आहेत. शासन आपल्या दारी उपक्रमा दरम्यान नगर जिल्ह्यात देवेंद्र लांबे व त्यांच्या सहकाऱ्यांचे काम अव्वलस्थानी होते , असे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे जिल्हा समन्वयक कृष्णा काळे म्हणाले.
या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेची राहुरी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी महिला आघाडी तालुकाध्यक्ष पदी वनिता जाधव, राहुरी शहर महिला आघडी प्रमुख श्रावणी साळे, उपतालुकाप्रमुख प्रशांत खळेकर, तालुका कार्याध्यक्ष किशोर मोरे, तालुका संपर्क प्रमुख अशोक तनपुरे, संघटक महेंद्र उगले, प्रसिद्धी प्रमुख बाप्पुसाहेब काळे, तालुका सहसंघटक ज्ञानेश्वर धसाळ, कायदेशीर सल्लागार ॲड. चंद्रशेखर शेळके, आदिवासी सेल उपप्रमुख रमेश सोनवणे, वांबोरी शहर प्रमुख अंकुश पवार, राहुरी विधानसभा कार्याध्यक्ष अरुण जाधव, ब्राम्हणी गणप्रमुख रमेश म्हसे, ब्राम्हणी विभाग प्रमुख विजय आढाव, गुहा गणप्रमुख वैभव लांबे, वांबोरी गणप्रमुख मिलिंद हरिश्चंद्रे, उपतालुका प्रमुख अनिल आढाव आदींच्या निवडी करून नियुक्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन महेंद्र उगले यांनी केले तर आभार अशोक तनपुरे यांनी मानले. या कार्यक्रमास शेकडो शिवसैनिक, शिवदूत उपस्थित होते.