रविवारी वाचक मेळावा, काव्यचर्चा आणि कवी संमेलन
अहमदनगर – ‘वाचकपीठ समूह आणि न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मराठी विभागाच्या वतीने रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत वाचकमेळावा, काव्यचर्चा आणि निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे’ अशी माहिती वाचकपिठ चे सदस्य मारूती सावंत व दादा नंनवरे यांनी दिली.
रविवारी सकाळी १०.३० वा. न्यू आर्ट्स चे प्राचार्य भास्करराव झावरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, प्रा.डॉ.रामचंद्र साळुंखे, नम्रता फलके, डॉ. संजय कळमकर, प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित, कवी चंद्रकांत पालवे, मसाप, सावेडी चे जयंत येलूरकर, शब्दगंध चे सुनील गोसावी, सुनीताराजे पवार, अंजली कुलकर्णी, प्रा. डॉ.राजेंद्र सलालकर, प्राचार्य डॉ.च.वि.जोशी, प्रा.डॉ.सुधाकर शेलार, डॉ.शारदा देशमुख, डॉ.राजेश गायकवाड, प्रमोदकुमार अणेराव, अभय दाणी, पत्रकार भूषण देशमुख उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनानंतर अनुराधा पाटील यांच्या ‘आता वह्या सगळ्या बुडीत खाती’ या काव्यसंग्रहावर प्राचार्य डॉ.महेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली मासिक काव्यचर्चा होणार असून यामध्ये प्रा.डॉ.कविता मुरूमकर, प्रा.डॉ.समिता जाधव, शरद ठाकर, भास्कर निर्मळ इत्यादी भाष्यकार सहभागी होणार आहेत. दुपारी दोन वाजता वाचकपीठ काव्यसंमेलन औरंगाबाद येथील कवयित्री प्रिया धारूरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवयित्री शर्मिला गोसावी व कवी संदीप काळे हे करणार आहेत.
याकाव्य संमेलनामध्ये मारुती सावंत, शशिकांत शिंदे, संदीप जगदाळे, संगीता अरबुने, स्वाती पाटील, डॉ.विशाल इंगोले, महेश खरात, हबीब भंडारे लवकुमार मुळे, अमोल बागुल, रामदास खरे, भाग्यश्री वाघमारे, शर्मिला गोसावी, अलका गांधी, वर्षा ढोके, डॉ.कैलाश दौंड, डॉ.ज्योती कदम, प्रथमेश पाठक, नामदेव कोळी, माधुरी मरकड, प्रशांत केंदळे, माधुरी चौधरी, किरण भावसार, अशोक पाठक, पवन नालट, योगिनी सातारकर, मेघराज मेश्राम, डॉ.शंकर चव्हाण, डॉ.कविता मुरूमकर, संजय चौधरी, गणेश कनाडे, देविदास फुलारे इत्यादी कवी सहभागी होणार आहेत. तरी या साहित्यिक कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य चंद्रकांत भोसले, प्रा.डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे, ज्योती धर्माधिकारी, साधना कस्पटे, अरविंद सोनवणे, प्रा. डॉ.वैशाली भालसिंग, प्रा.डॉ.बाळासाहेब सागडे यांनी केले आहे.