धार्मिक

हरेगाव मतमाउली यात्रापूर्व तिसरा शनिवार नोव्हेना भक्तिभावाने संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील संत तेरेजा चर्च हरेगाव येथे अमृत महोत्सवी मतमाउली यात्रापूर्व नोव्हेनाचा तिसरा शनिवार भक्तिभावाने संपन्न झाला.

त्यावेळी ज्ञानमाउली चर्च नेवासा धर्मगुरू रे.फा. दिलीप जाधव यांनी ‘ख्रिस्त सभेच्या सहभागात नित्य सहाय्य करणारी माता’ या विषयावर प्रतिपादन केले की, ख्रिस्ताच्या आणि पवित्र आत्म्याच्या रहस्यात पवित्र मरीयेची भूमिका स्पष्ट केली जाते. कुमारी मरिया देवाची आणि तारणाऱ्याची आई म्हणून ख्रिस्तसभा तिचा मानसन्मान करते. ती सहाजिकच ख्रिस्ताच्या सभासदांची आई आहे. तिच्या प्रीतीव्दारे जे ख्रिस्त सभासद आहेत. त्यांना जन्म देण्यात देवाला सहकार्य केले. तिच्या पुत्राशी तिचे असलेल्या ऐक्यापासून वेगळी करता येत नाही किंबहुना त्यातूनच ती प्रगट होते.

तारणकार्यात पुत्राबरोबर मातेचे ऐक्य हे मरीयेच्या उदरातील ख्रिस्ताच्या जन्मापासून तर मरणापर्यंत प्रकट होते. परमेश्वराच्या योजनेनुसार ती कृसाखाली उभी राहिली. तिच्या एकुलत्या एक पुत्रासह अति दु:ख सहन करून त्याच्या बलिदानात आईच्या हृदयाने ती सहभागी झाली व प्रेमाने तिच्यापासून जन्मलेला येशुख्रिस्त जो क्रुसावर मरण पावणार होता त्या बाळासाठी तिने संमती दिली. बाई पहा तुझा मुलगा ह्या शब्दात त्याच्या शिष्याची आई झाली. तीच आज विश्वाची आई ठरली. या उपासनेत, भक्तीत आपण आईची महिमास्तुती करण्यास परमेश्वराकडे सामर्थ्य मागू या.

आजच्या नोव्हेनात मिस्सा व प्रवचन प्रसंगी ज्ञानमाउली चर्च धर्मगुरू रे फा.दिलीप जाधव, जॉन गुलदेवकर तसेच केंदळ येथील फा.आल्विन, हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक, सचिन रिचर्ड सहभागी होते. यावेळी नेवासा व केंदळ येथील भाविक व के,सेंट मेरी स्कूल येथील सर्व सिस्टर्स, व हरेगाव येथील धर्मभगिनी, परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दि २२ जुलै चौथ्या शनिवारी देवाच्या योजनेतील पवित्र मरिया या विषयावर लोयोला सदन, श्रीरामपूर व संत झेवियर चर्च टिळकनगर येथील धर्मगुरू नोव्हेनात सहभागी होणार आहेत. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक रोझारिओ यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button