उत्तर महाराष्ट्र
कुलगुरूंच्या भेटी दरम्यान गुलदगड यांच्याकडून विविध विषयांवर चर्चा
नाशिक – श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी नुकतीच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू संजीव सोनवणे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.
सदर भेटीत महाराष्ट्रभर मुक्त विद्यापीठ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती घेऊन या व्यतिरिक्त कोणत्या योजना राबवल्या जातील याविषयी चर्चा केली. तसेच नाशिक हे कांदा, भाजीपाला व द्राक्षांचे माहेरघर आहे. यापुढे विद्यापीठाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबरोबर नव उद्योजकांना उद्योगांचे मार्गदर्शन करण्याबाबत, या आणि अशा भरपूर महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी कुलगुरु सोनवणे यांचा वि वा शिरवाडकर लिखित नटसम्राट पुस्तक व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.