खा.गोविंदराव आदिक पतसंस्थेचा कारभार सभासदाभिमुख : अविनाश आदिक
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अशोकनगर विद्यालयात संपन्न झाली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सर्वेसर्वा अविनाश आदिक, श्रीरामपूर नगरपरिषदेच्या प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक व सहसचिव ॲड.जयंत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी खा.गोविंदरावजी आदिक व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब बनकर होते. त्यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. संस्थेचे सचिव अविनाश आदिक यांनी पतसंस्थेच्या कारभाराविषयी समाधान व्यक्त करून पतसंस्थेने कमी व्याजदरात राष्टीयकृत बॅंकेकडुन भागभांडवल उभे करून ते सभासदांना वाटप केल्यास जास्त नफा मिळेल ही अपेक्षा व्यक्त केली. तसेच नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी पतसंस्थेचे सभासद संख्या कमी होत आहे. त्याचप्रमात नफा कमी होतो याकडे सर्वांचे लक्ष वेधुन पतसंस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.
सभा अध्यक्ष सूचना संजय शिंदे यांनी तर अनुमोदन बाळासाहेब वमने यांनी दिले. सुत्रसंचलन विष्णू राऊत यांनी तर खर्च व अंदाजपत्रक मंजुरी वाचन व आभार व्हा. चेअरमन अशोक कटारे यांनी मानले. श्रध्दांजली ठरावाचे वाचन सुभाष काळे, प्रोसिडिंग व वार्षिक ताळेबंद वाचन मॅनेजर संतोष दांडगे, नफा वाटणी वाचन सौ.मंदाकिनी खाजेकर, लेखा परीक्षण अहवाल वाचन संदिप बोरुडे, दोष दुरूस्ती वाचन बाळासाहेब वमने, संचालक मंडळ येणे कर्ज वाचन मुदस्सीर सय्यद, लेखापरीक्षक नियुक्ती वाचन विजय थोरात, बॅक कर्ज उचल वाचन शामराव तऱ्हाळ, पोटनियम दुरूस्ती नवनाथ बर्डे यांनी केले.
यावेळी संचालक सुभाष पटारे, संगीता घोडे तसेच संस्थेच्या सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात पतसंस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली.